राहुल गांधी यांच्या याचिकेवर 29 एप्रिलला सुनावणी; सुरत कोर्टाच्या नकाराला आव्हान
मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांच्या विषयी आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) याचिका दाखल केली आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. आता या प्रकरणात पुढे काय समोर येते याकडे देशाचे लक्ष लागून आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नावं सारखीच का आहेत? सगळ्या चोरांचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं. या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते.