राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवरून आठवले यांची टोलेबाजी; म्हणाले…
तुम्हाला भारत जोडो यात्रा काढावीशी वाटते तर काढा असे म्हणत काय केलं काँग्रेसनं 70 वर्षात असा सवाल केला आहे. 70 वर्षांत काँग्रेसने भारत जोडला नाही? पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी भारत जोडला नाही?
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून व प्रत्यक्ष सहभागातून कन्याकुमारी ते जम्मु-काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. सर्वसामान्य लोक या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. त्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निशाना साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ही टीका त्यांनी मुंबईतील सोमय्या मैदानावर आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महामेळाव्यात केली. यावेळी तुम्हाला भारत जोडो यात्रा काढावीशी वाटते तर काढा असे म्हणत काय केलं काँग्रेसनं 70 वर्षात असा सवाल केला आहे. 70 वर्षांत काँग्रेसने भारत जोडला नाही? पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी भारत जोडला नाही? आज तुम्हाला भारत जोडण्याची गरज आटत आहे. त्यामुळे ही यात्रा म्हणजे नाटक असून राहुल गांधी आम्ही 2024 ला उघड्यावर आणू असा इशारा त्यांनी दिला आहे.