मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी

| Updated on: Mar 25, 2023 | 10:51 AM

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिपणीवर सुरत न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने तत्परतेने राहुल गांधी यांचे सदस्य रद्द केले.

त्यावरून आता काँग्रेससह मविआचे घटक पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. तर याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली जात आहे. याचप्रकरणावरून ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही अशा आशयाचे बॅनर ठाणे शहरात जागोजागी लावण्यात आले आहे.

Published on: Mar 25, 2023 10:51 AM