तर मग बच्चू कडू यांचीही आमदारकी रद्द करा; पुण्यात कोणाची मागणी
पुण्यात आमदार बच्चू कडू विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी सुरू आहे. यामुळे राजकारण गरम झाले आहे.
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांनी सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं? असे म्हणत स्वत: वर टीकेची झोड उठवून घेतली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला चालला. ज्यात त्यांना शिक्षा झाली आणि आता त्यांची खासदारकीही रद्द झाली. त्यावरूनच आता पुण्यात आमदार बच्चू कडू विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी सुरू आहे. यामुळे राजकारण गरम झाले आहे.
पुण्यातील पाषाण रोड परिसरात बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. यावर, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” असं लिहण्यात आलं आहे.
Published on: Mar 25, 2023 11:39 AM
Latest Videos