नागपुरातील काँग्रेसचा बडा नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात?; पक्षातूनही होणार हाकालपट्टी?

नागपुरातील काँग्रेसचा बडा नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात?; पक्षातूनही होणार हाकालपट्टी?

| Updated on: Apr 06, 2023 | 8:22 AM

पक्ष नेतृत्वाला चुकीची वक्तव्य करणं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात राहणं या गोष्टी देशमुख यांना महागात पडताना दिसत आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. तर ते शरद पवार यांना भेटल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान होत आहे. त्यांनी जनतेची माफी मागवी असे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी म्हटलं होते. त्यानंतर पक्षातून त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते आमच्या पक्षाचे नाहीत असे जाहिरच बोलले होते. पक्ष नेतृत्वाला चुकीची वक्तव्य करणं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात राहणं या गोष्टी देशमुख यांना महागात पडताना दिसत आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. तर ते शरद पवार यांना भेटल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

देशमुख यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आला होता. तर यासंदर्भात विचारणा प्रदेश काँग्रेस समितीकडून करण्यात आली होती. त्यांना तसे पत्र ही देण्यात आलं होतं. मात्र देशमुख यांनी उत्तर ही दिलं नाही. शिवाय माफीही मागितली नाही. त्यामुळे देशमुख यांची हकालपट्टी काँग्रेसमधून निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Apr 06, 2023 08:22 AM