सहन करणार नाही म्हणजे काय करणार?; शिंदेंचा ठाकरेंना सवाल
भाजप-शिवसेनेच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा आज ठाण्यात काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच काय तुम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांप्रमाणे राहुल गांधी यांना जोडे मारणार का? असा सवाल ही उपस्थित केला
ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार वीर सावरकर यांचा अपमान केला. तर ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली. त्यावरून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजप-शिवसेनेच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा आज ठाण्यात काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच काय तुम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांप्रमाणे राहुल गांधी यांना जोडे मारणार का? असा सवाल ही उपस्थित केला. त्याबरोबर राहुल गांधींनी सावरकर यांचा वारंवार अपमान जाणीवपूर्वक केला त्याचा निषेध करावा, धिक्कार करावा तेवढा थोडा असल्याचे ते म्हणाले. पण दुर्दैवाने हेच लोक त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. हेच महाराष्ट्राचं देशाचं दुर्दैव असल्याची टीका देखिल त्यांनी केली आहे.