‘उद्धव ठाकरेंना देखील जनाब बोलावं लागेल’; हिंदुत्वावरून भाजप नेत्याची टीका
विधान भवनाच्या पाऱ्यांवरच सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो ही करण्यात आला. यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सावरकर यांच्यावर सतत चर्चेत असतात. याच्या आधी देखील राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलले होते. ज्यामुळे त्यांच्यावर भाजपकडून टीका झाली होती. तर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत होती. यादरम्यान राहुल गांधी ट्विट करत हसत असल्याचा फोटो शेअर केला आणि लिहिले, सावरकर समजला काय… नाव राहुल गांधी आहे. त्यानंतर आता त्याच्याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं आहे.
विधान भवनाच्या पाऱ्यांवरच सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो ही करण्यात आला. यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल आहे. ते आता पोडगे झाले आहेत. त्यांच्याकडनं सावरकरांचा सन्मान आम्ही अपेक्षित ठेवत नाही. उद्धव ठाकरेंना देखील जनाब उद्धव ठाकरेजी बोलावं लागेल ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे.