शिवानी वडेट्टीवारच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राजकारण पेटलं; विजय वडेट्टीवार यांचं समर्थन तर फडणवीस यांची टीका
याचदरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या कन्येनं शिवानी वडेट्टीवार यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केलय
नागपूर : राज्यात काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने वादंग सुरू आहे. भाजपने याविरोधात आवाज उठवत राज्यात सावरकर गौरव यात्रा काढली आहे. तर राहुल गांधी यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याचदरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या कन्येनं शिवानी वडेट्टीवार यांनी वीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, अशा विचारांचं सावरकरांनी समर्थन केलं, असा दावा शिवानी यांनी केलय. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आज या वक्तव्याचं समर्थन केलंय.शिवानी यांनी सावरकरांचं एक पुस्तक वाचून हे वक्तव्य केलंय. यावर तीच खुलासा करेल. भाजपने आरोप करण्यापूर्वी आधी संपूर्ण सावरकर वाचावा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. तर यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची अशी खोचक टीका केली आहे.