काँग्रेसचे बंडखोर नेते बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पाहा..
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे दाभेकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करत थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसमध्ये आता आलेल्या माणसाला उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मोहन जोशी आणि विरेंद्र किराड यांनी माझं तिकीट कापलं आहे. म्हणून मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसमधील गट तटाच्या राजकारणामुळे मला उमेदवारी नाकारण्यात आली, असं बाळासाहेब दाभेकर म्हणाले आहेत.
Latest Videos