महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावू नका; काँग्रेस नेत्याचा भाजपवर पलटवार
ज्याप्रकारे भाजप बोलत आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. तर राहुल गांधी यांना भाजपवाले घाबरायला लागले आहेत. तर गांधी या नावातच दम आहे. इंग्रजासारखे लोक सुद्धा गांधी नावानं घाबरून पळाले. त्यामुळेच राहुल गांधींच्या बद्दलच असे बोलले जात आहे
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर टीका करत मी सावरकर नाही गांधी आहे असं म्हणणं गुन्हा असेल तर आम्ही करू असे म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राज्यात आल्यावर जर भाजपने त्यांना विरोध केला. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर जशाच तसे उत्तर देवू असा इशारा देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्याप्रकारे भाजप बोलत आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. तर राहुल गांधी यांना भाजपवाले घाबरायला लागले आहेत. तर गांधी या नावातच दम आहे. इंग्रजासारखे लोक सुद्धा गांधी नावानं घाबरून पळाले. त्यामुळेच राहुल गांधींच्या बद्दलच असे बोलले जात आहे. मी सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे हा गुन्हा करोडो लोक या देशांमध्ये करणार. तर मी राहुल गांधी आहे म्हटलं यांना काय त्रास व्हायला असा सवाल भाजपला केला. फक्त लोकांना त्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप सत्तेमध्ये बसून असा तमाशा करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.