नाना पटोले यांची अजित पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले ‘सरड्यासारखा रंग...’

नाना पटोले यांची अजित पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले ‘सरड्यासारखा रंग…’

| Updated on: Jul 27, 2023 | 8:21 AM

अधिवेशनामध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गटाने निधी वाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारची कोंडी केली आहे. तर थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली जात आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गटाने निधी वाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारची कोंडी केली आहे. तर थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली जात आहे. याचदरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अधिवेशनात महिलांचे मृत्यू, आदिवासी यांच्या प्रश्नावरून आवाज उठवला आहे. यावेळी पटोले (Nana Patole) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) शाब्दिक हल्लाबोल करताना, त्यांनी सरड्यासारखा रंग बदलला असा घणाघात केलाय. सरडा रंग बदलतो. त्याचप्रमाणे अजित पवारांनाही रंग बदलला. मी अजित पवारांना सरडा म्हणत नाही. मात्र, सध्या त्यांच्यात माणुसकीचा धर्म दिसत नाही असाही पटोले यांनी असा खोचक टोला लगावला आहे.

Published on: Jul 27, 2023 08:21 AM