Nana Patole | Monsoon Assembly 2022 | अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – tv9
सध्या रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून त्यावर अधिक बोलणं योग्य नसल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, यांचे भय आणि भूक हे ब्रिद वाक्य बनले आहे.
मुंबई : सध्या अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू असून सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घेरण्याचे काम विरोधक करत आहेत. यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत बोलताना, त्या याच्या आधी राज्यात आयपीएस अधिकारी म्हणून काम केलेल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या असाव्यात असे म्हटलं आहे. तसेच काहीही झालं तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही असेही ते म्हणाले. तर सध्या रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून त्यावर अधिक बोलणं योग्य नसल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, यांचे भय आणि भूक हे ब्रिद वाक्य बनले आहे. मात्र लोकशाहीत असे भय आणि भूतचे भूत जास्त दिवस दाखवून चालत नाही.