Nana Patole | ‘ईडी सरकारची उलटी गिनती सुरु’-नाना पटोले-tv9
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. तसेच त्यांनी कंबोज यांच्या ट्विटचा समाचार घेताना, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडता येऊ नयेत म्हणून हे काम ईडी सरकारचा गुर्खा कंबोज करत असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत लवकरच राष्ट्रवादीचा एक मोठा नेता नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याकडे जाणार आहे. तेथे पाचवी जागा रिकामी आहे. आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के असतो असेही कंबोज यांनी लिहिलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. तसेच त्यांनी कंबोज यांच्या ट्विटचा समाचार घेताना, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडता येऊ नयेत म्हणून हे काम ईडी सरकारचा गुर्खा कंबोज करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
Latest Videos