‘निधी वाटपावरून दुजाभाव केला जातोय’; वायकर यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्याचाही न्यायालयात जाण्याचा इशारा

‘निधी वाटपावरून दुजाभाव केला जातोय’; वायकर यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्याचाही न्यायालयात जाण्याचा इशारा

| Updated on: Jul 25, 2023 | 8:41 AM

पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद करताना, आपल्या गटासह शिंदे गटातील आमदारांना भरघोस निधी दिलाय. तर शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांना १५० कोटींची तरतूद केलीय. त्यावरून विरोधकांत आता नाराजी सुरू झाली आहे.

मुंबई | 25 जुलै 2023 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अजित पवार गट, शिंदे गटातील आणि अजित पवार गटाला सपोर्ट करणाऱ्या आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद करताना, आपल्या गटासह शिंदे गटातील आमदारांना भरघोस निधी दिलाय. तर शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांना १५० कोटींची तरतूद केलीय. त्यावरून विरोधकांत आता नाराजी सुरू झाली आहे. तर टीका केली जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत. तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील निधी वाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडताना अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. यावेळी पटोले यांनी, निधी वाटपावरून दुजाभाव केला आहे. त्यांच्या आमदारांना खुश करण्यामुळे राज्याच आर्थिक दिवाळ निघतय हे त्यांनी लक्षात ठेवावं असा सल्ला दिला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधक असं दुजाभाव सरकारने करण योग्य नाही त्यांनी असाच दुजाभाव ठेवला तर आम्ही न्यायालयात नक्की जाऊ असा इशारा दिला आहे. तर त्यांच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी राज्याला दिवाळखोराकडे जाता कामा नये असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Published on: Jul 25, 2023 08:41 AM