काँग्रेसने दावा केला? दावेदार चार, कोणाच्या गळ्यात पडणार विरोधी पक्षनेतेपदाची माळ
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेताच राहिलेला नाही. तर अजूनही नेता निवडला गेलेला नाही.
मुंबई, 16 जुलै 2023 | पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्यात सध्या पेच निर्माण झाला असून विरोधी पक्ष नेत्याची निवडण झालेली नाही. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेताच राहिलेला नाही. तर अजूनही नेता निवडला गेलेला नाही. तर यावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. यादरम्यान काँग्रेसमधून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानंतर कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे. तर सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्यापैकी कोणाला विरोधी पक्षनेतेपदी संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहेत.
Published on: Jul 17, 2023 12:14 PM
Latest Videos