Aurangabad | काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Aug 04, 2022 | 8:53 PM

भारतीय जनता पार्टीचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी काँग्रेसमधल्या पदाधिकाऱ्यांना वैतागून आपण भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याचं रामू काका शेळके यांनी सांगितले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामू काका शेळके यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसला असून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी काँग्रेसमधल्या पदाधिकाऱ्यांना वैतागून आपण भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याचं रामू काका शेळके यांनी सांगितले.

Published on: Aug 04, 2022 08:53 PM