बाबासाहेबांमुळे उपेक्षितांना न्याय मिळाला! : एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले. त्यांच्या याच संविधानावर आपले राज्य, देश चालत आहे
भुसावळ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भुसावळमध्येही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले. त्यांच्या याच संविधानावर आपले राज्य, देश चालत आहे. कधी काळी ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला. तेच लोक आज त्यांना वंदन करत आहेत. ते पुढे येत आहेत. याचा आपल्याला आनंद असल्याचे मत खडसे यांनी मांडले. तर बाबासाहेबांमुळे उपेक्षितांना न्याय मिळाल्याच्या भावना खडसे यांनी आज आपल्या व्यक्त केल्या.