उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांचा गोंधळ, एकच खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण झाले. हा ध्वजारोहनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
कोल्हापूर, 15 ऑगस्ट 2023 | स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याच्या काणोकोपऱ्यात विविध ठिकाणी ध्वजारोहन पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात ध्वजारोहण झाले. हा ध्वजारोहनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्याचबरोबर मराठा समाजाच्या काही नेत्यांची बैठकही बोलावली. यावेळी एकट गोंधळ उडाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत माहिती अशी की, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी बैठकीत घेण्यात आली. त्यावेळी मराठा वनवास यात्रेचे अध्यक्ष योगेश केदार आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तर आपल्याला बोलू द्या. आम्हाला मराठा आरक्षणाच्या बैठकीपासून लांब ठेवले जात ही बैठक फक्त कोल्हापूरसाठीच मर्यादित आहे का? असा प्रश्न विचारत गोंधळ घातला. यावेळी अजित पवार यांच्यासमोरच हा गोंधळ झाल्याने पोलिसांनी केदार आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना रोखले. यावरून तेथे गोंधळ उडाला. तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.