Pravin Darekar | आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर-Tv9

Pravin Darekar | आधी आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा : प्रवीण दरेकर-Tv9

| Updated on: Aug 25, 2022 | 1:23 PM

यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा मग शिंदे गटातील आमदार राजीनामा देतील असं म्हटलं आहे.

अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आज झाडल्या. यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आधी आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा मग शिंदे गटातील आमदार राजीनामा देतील असं म्हटलं आहे. तसेच दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांनी राजीमाना दिला तर शिंदे गटातील एक आमदार काय दोन आमदार राजीनामे देतील. होऊन जाऊ द्या एकदा दूध का दूध पाणी का पाणी असं म्हटलं आहे. तर त्यावर आदित्य ठाकरेंनी देखील पलटवार करताना, करा सरकार बरखास्त आणि या निवडणूकीला सामोरं. कोणाची लोकप्रियता चांगली आहे आणि लोकांना काय मान्य आहे ते त्यांनाच ठरवू दे असं म्हटलं आहे. या 40 लोकांनी राजीनामा द्यावेत आम्हीही निवडणूकीला समोरं जाऊ असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.