‘आता स्वतःच्या स्वार्थी राजकारण...’, पंकजा मुंडे यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका? म्हणाला, ‘कोरडं प्रेम...’

‘आता स्वतःच्या स्वार्थी राजकारण…’, पंकजा मुंडे यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका? म्हणाला, ‘कोरडं प्रेम…’

| Updated on: Jul 01, 2023 | 10:11 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. याच मुद्द्यावरून विखे पाटील यांनी देखील आपली बाजू मांडली. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या, मी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे.

सोलापूर : बीड येथील एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाता मुद्दा मांडला. त्यांनी मोठं भाष्य करताना आपला निर्धार बोलून दाखवला. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. याच मुद्द्यावरून विखे पाटील यांनी देखील आपली बाजू मांडली. मात्र आता पंकजा मुंडे यांच्या, मी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. यावरून सकल मराठा समाजचे समन्वयक माऊली पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. त्यांनी, पंकजा ताई स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळ खेळू नका असं आवाहन केलं आहे. त्याचबोरबर मराठा समाजाबद्दल खरं प्रेम असेल तर 50% ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी करा अशी मागणी केलं आहे. तर 2018 साली मराठा समाजाच्या आरक्षण समितीत आपण होतात. आरक्षण देणार म्हंटल्यावर आपण बैठकीतून उठून गेलात. तर लाखोंनी मराठा समाज रस्त्यावर उतरल्यावर पाठिंब्याचं एक पत्रही तुम्ही काढले नाही किंवा बीडच्या क्रांती मोर्चात सहभागी झाले नव्हता असा खुलासा करताना टीका केली आहे. तर आता स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी फेटा बांधणार नाही असे सांगतायत. मराठा समाजावर असा कोरडं प्रेम करू नका असं म्हणतं सकल मराठा समाज आपल्या राजकीय भवितव्यासाठी प्राणाची आहुती देईल असाही इशारा दिला आहे.

Published on: Jul 01, 2023 09:37 AM