दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता, मात्र लसीकरण वेगवान झाल्यास काळजी नाही – Rajesh Tope

| Updated on: Oct 19, 2021 | 6:46 PM

कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. टोपे यांनी दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

“सध्या कोठेही तिसऱ्या लाटेची सुरुवात नाही. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. तसेच सध्या कोरोना चाचणीसुद्धा कमी केलेल्या नाहीयेत, ” असे राजेश टोपे म्हणाले.

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, दिल्लीतून देवेंद्र फडणवीस
Raosaheb Danve | अमित शाहा यांच्याशी राज्यातल्या साखर कारखान्याच्या अडचणीबाबत चर्चा : रावसाहेब दानवे