शिवसेनेच्या एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण; तुम्ही ही चाचणी करून घ्या, केले आवाहन

शिवसेनेच्या एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण; तुम्ही ही चाचणी करून घ्या, केले आवाहन

| Updated on: Mar 29, 2023 | 7:26 AM

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत देसाई यांनी स्वतःच माहिती दिली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढताना दिसत आहे. राज्याच्या मोठ्या शहरांसह छोट्या शहरात ही आता कोरोना परत आहे. त्यातच आता मंत्र्यांना देखील कोरोना झाल्याने एकच चिंता व्यक्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत देसाई यांनी स्वतःच माहिती दिली आहे.

शंभूराज देसाई यांनी, सोशल मीडियावर पोस्ट टाकत ही माहिती दिली आहे. त्यांनी, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी निवासस्थानी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करतो, असे म्हटलं आहे.

Published on: Mar 29, 2023 07:26 AM