वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारी; भारती पवार यांनी आरोग्य विभागाचं प्लॅनिंग सांगितलं…
मागच्या काही दिवसांपासून कोरोच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या काय म्हणाल्यात? पाहा...
नाशिक : मागच्या काही दिवसांपासून कोरोच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या बाबतची माहिती दिली आहे. “आज आणि उद्या आरोग्य विभागाकडून मॉकड्रिल केलं जाईल. जिल्हा शासकीय रुग्णालयात काय तयारी आहे, याचा मी घेते आहे. रुग्ण वाढल्यावर प्रशासनाची धावपळ होऊ नये, म्हणून तयारीसाठी मॉकड्रिल केलं जात आहे”, असं डॉ. भारती पवार यांनी सांगितलं आहे. ज्येष्ठ रुग्णांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठीही प्रशासन सज्ज आहे. आवश्यकतेनुसार राज्य लस खरेदी करू शकतात, असंही त्या म्हणाल्या. गर्दीच्या ठिकाणी स्वतः हून काळजी घेणं आवश्यक आहे. नागरिकांनी आवश्यक असल्यास मास्क वापरावा, असंही डॉ. भारती पवार यांनी सांगितलं आहे.
Published on: Apr 10, 2023 01:20 PM
Latest Videos