कोरोनावरून अजित पवारांची सरकरावर टीका; म्हणाले, हे सरकार...

कोरोनावरून अजित पवारांची सरकरावर टीका; म्हणाले, हे सरकार…

| Updated on: Apr 07, 2023 | 3:09 PM

सरकारी कार्यलय असो किंवा सामान्य नागरिक त्यांना मास्कवरून आदेश काढले पाहिजेत. मात्र मंत्री, अधिकारीच मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनतेला गांभीर्य राहिलेलं नाही

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वर काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील मोठ्या शहरात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन करत हे सरकार कोरोनावर गंभीर नसल्याचे म्हटलं आहे. कोरोना परिस्थिती काय आहे? याची नेमकी परिस्थिती सांगा असं अधिवेशनात मागणी करत सरकारला सांगितलं होतं. पण या सरकारला गांभीर्य दिसत नाही. सरकारी कार्यलय असो किंवा सामान्य नागरिक त्यांना मास्कवरून आदेश काढले पाहिजेत. मात्र मंत्री, अधिकारीच मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनतेला गांभीर्य राहिलेलं नाही. सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोरोनाची सध्याची वस्तू स्थिती जनतेला सांगावी. जर त्यांना अयोध्येला जायचं असेल तर जाऊद्या. राज्यात उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री राज्यात उपलब्ध आहेत त्यांनी कोरोनाची स्थिती सांगावी असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

Published on: Apr 07, 2023 03:09 PM