Corona vaccination | मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून नोंदणीला सुरुवात

| Updated on: Dec 28, 2021 | 10:15 AM

एक अतिशय महत्त्वाची आणि पालकांना दिलासा देणारी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

नवी दिल्ली : एक अतिशय महत्त्वाची आणि पालकांना दिलासा देणारी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. Cowin पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे.खरे तर 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने तूर्तास 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायला मान्यता दिली आहे. ओमिक्रॉनच्या विषाणूमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता अमेरिका आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे.