'मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5 टर्म हलत नाही' : रवींद्र धंगेकर

‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5 टर्म हलत नाही’ : रवींद्र धंगेकर

| Updated on: Mar 13, 2023 | 7:15 AM

माझं जनतेवर प्रेम आहे आणि जनता माझा परिवार आहे. याच परिवाराचा आशीर्वाद गेली नऊ निवडणुकांत मला मिळत आहे. आता तर मला विधानसभेत पाठवले आहे

पुणे : नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी त्यांनी, माझं जनतेवर प्रेम आहे आणि जनता माझा परिवार आहे. याच परिवाराचा आशीर्वाद गेली नऊ निवडणुकांत मला मिळत आहे. आता तर मला विधानसभेत पाठवले आहे. त्यांची सेवा करणे, चांगले काम करणे हेच ध्येय असेल. धंगेकर यांच्या विजयामुळे मविआला एक नवी संजीवणी मिळाली आहे. त्यामुळे 2024 ला काय भूमिका असेल. यावर धंगेकर यांनी ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5,10 टर्म हलत नाही’ असं म्हटलं आहे

Published on: Mar 13, 2023 07:15 AM