तू अजून राणेंना ओळखलं नाहीस, तुझ्या उद्धव ठाकरेला जाऊन विचार; राऊत यांच्यावर कोणी केली एकेरी शब्दात टीका

तू अजून राणेंना ओळखलं नाहीस, तुझ्या उद्धव ठाकरेला जाऊन विचार; राऊत यांच्यावर कोणी केली एकेरी शब्दात टीका

| Updated on: Apr 27, 2023 | 1:56 PM

तसेच नारायण राणे यांचे नाव घेऊन आम्हाला घाबरायची हिम्मत करत असाल तर आधी तुमच्या उद्धव ठाकरे यांना विचारा असा टोला लगावला आहे. तर तेच उद्धव ठाकरे हे नारायण राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांना घेतल्या शिवाय बाहेर पडत नव्हते.

मुंबई : भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासाधी राऊत यांनी बघावं. भ्रष्टाचाराचे आरोप हे आदित्य ठाकरे, नंदकिशोर चतुर्वेदी, पाटणकर यांच्यावरही झाले आहेत. त्यामुळे चौकटीर राहून बोलायच असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. राऊत यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या अरोपावरून त्यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच नारायण राणे यांचे नाव घेऊन आम्हाला घाबरायची हिम्मत करत असाल तर आधी तुमच्या उद्धव ठाकरे यांना विचारा असा टोला लगावला आहे. तर तेच उद्धव ठाकरे हे नारायण राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांना घेतल्या शिवाय बाहेर पडत नव्हते. इतके ते घाबरले होते. तर रामदास कदम यांच्या भाषेत बोलायचं तर उद्धव ठाकरे यांची चड्डी पिवळी व्हायची. हे रामदास कदमच बोललेत. हव तर उद्धव ठाकरे यांना विचार. त्यामुळे राणेंवर यापुढे विचार करून बोलायचं. जर फडणवीस किंवा आणि कोणत्या भाजप नेत्याबद्दल बातमी सोडली तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे कपडे फाडून ठेऊ. राज्यातील जनतेलाही कळू दे की राऊत यांच्यामुळेच ठाकरे कुटुंबाची बदनामी होतेय ठाकरे कुटुंबाची अंडी पिल्ले बाहेर निघतायेत.

Published on: Apr 27, 2023 01:56 PM