Beed | बीडमध्ये जलयुक्त शिवार भ्रष्टाचार भोवला, सेवानिवृत्त विभागीय कृषी संचालकावर गुन्हा दाखल

| Updated on: May 19, 2021 | 6:01 PM

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मजूर संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून 20 लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यावर होता. (Corruption in Jalyukt Shivar in Beed, case filed against retired Divisional Director of Agriculture)

बीड : जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत 20 लाखांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यासह सहा अधिकाऱ्यांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने एकच खळबळ उडालीय. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मजूर संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या माध्यमातून 20 लाखांचा तथाकथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप कृषी सहसंचालक रमेश भताने यांच्यावर होता. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपसचिव एस एस धपाटे यांनी दिले होते.