नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, नवरात्रात होणार का कारवाई?

| Updated on: Sep 30, 2022 | 4:55 PM

नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रकरणात कोर्ट नेमके काय आदेश देते याकडे राज्याचे लक्ष लागले होते. राणांच्या जात प्रमाणापत्रावर आक्षेप घेतल्याने त्याची सुनावणी अमरावतीच्या सेशन कोर्टात सुरु होती. त्याचे झाले असे..

मुंबई : नवनीत राणांच्या (Navneet Rana) जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे अमरावती (Amravati) जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले होते. याबाबत कोर्टांने (Court) सुनावणी केली असून नवनीत राणा यांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. 8 ऑक्टोंबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे नवरात्र महोत्सवात कारवाईची कोणतीही टांगती तलवार नवनीत राणा यांच्यावर नसणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात राणांच्या विरोधाच अजामिनपात्र वॉरंट होते. यावर कोर्टाने स्पष्टीकरण देत 8 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत. सेशन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. नवनीत राणा ह्या अमरावतीच्या खासदार असून त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता.