क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता झाले, पोलिसात तक्रार केली; मग ‘असा’ लागला शोध
cricketer Kedar Jadhav Father Mahadev Jadhav Missing Case : क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी काल समोर आली. त्यानंतर पोलिसांना त्यांना शोधण्यात यश आलं आहे. केदारचे वडील सापडले कसे? संपूर्ण घटनाक्रम पाहा...
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी काल समोर आली. त्यानंतर पोलिसांना त्यांना शोधण्यात यश आलं आहे. केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती आधी समोर आली. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाले. केदार जाधव आपल्या कुटुंबियांसह पुण्यातील कोथरूड भागात राहातो. त्याचे वडील महादेव जाधव यांनी आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले. अन् ते परत आले नाहीत. त्यांच्याजवळ असलेला फोनसुद्धा बंद लागत होता. कुटुंबिय चिंतेत आलं. त्यांनी अखेर ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. केदारच्या चाहत्यांनीही शोध सुरु केला. महादेव जाधव हे अखेर मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडी भागात सापडले. पोलिसांनी केदारच्या वडिलांना कुटुंबाच्या हवाली केलं. त्यामुळे जाधव कुटुंबीयांसह केदारच्या चाहत्यांनाही दिलासा मिळाला.