Saamna | ‘शिंदे गटाचं अस्वल झालं आणि दरवेशी फडणवीस आहेत’-सामना-tv9
सामन्यातून शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करताना, शिंदे गटाचं अस्वल झालं आणि दरवेशी फडणवीस आहेत, असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. याच्याआधीच विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत हे अधिवेशन संघर्षाचं होणार असल्याची नांदी दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणजेच सामनातून देखील शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. सामन्यातून शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करताना, शिंदे गटाचं अस्वल झालं आणि दरवेशी फडणवीस आहेत, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर 50 कोटींत आमदार विकला जातो. या बातम्या धक्कादायक आहेत. त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय. हे 50-50 कोटी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांवर खर्च झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. विधिमंडळात या सगळय़ांवर उठाव व्हावा. उठाव हा शब्द शिंदे गटास प्रिय आहे, म्हणून हे सांगणे. तूर्तास इतकेच! असेही सामन्यातून टीका करण्यात आली आहे.