रावणाच्या अहंकाराचा नाश झाला, तुम्ही कोण ? निलेश लंके यांचा थेट हल्ला

रावणाच्या अहंकाराचा नाश झाला, तुम्ही कोण ? निलेश लंके यांचा थेट हल्ला

| Updated on: Mar 30, 2024 | 12:50 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अखेर काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्या तिकीटावर नगर दक्षिण लोकसभेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा काल राजीनामा दिला. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. निलेश लंके यांनी यावेळी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. दिवा विझताना त्याची वात मोठी होते अशी आपल्या तालुक्यातील परिस्थिती आहे. रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला होता. तर तुम्ही कोण ? अशी टीका त्यांनी सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे. आमच्याकडे तुमच्या प्रमाणे यंत्रणा नसेल पण जीवाला जीव देणारा मावळा आहे असेही ते म्हणाले. या संदर्भात सुजय विखे पाटील यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी निलेश लंके यांनी अजून उमेदवारी अर्ज भरलेला नाही, मग बोलूया असे म्हणत प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे.

Published on: Mar 30, 2024 12:48 PM