‘फौजदाराचा शिपाई होऊन येणार नाही’; राऊत यांची फडणवीस यांच्यावर पुन्हा येईनवरून टीका
त्यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाना साधला. त्यांनी फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची खिल्ली उडवली. यावेळी राऊत यांनी, फडणवीस यांना टोला लगावताना, मी पुन्हा येऊन पण देवेंद्रसारखा येणार नाही.
पाटण (सातारा) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तोफ शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये धडाडली. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाना साधला. त्यांनी फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची खिल्ली उडवली. यावेळी राऊत यांनी, फडणवीस यांना टोला लगावताना, मी पुन्हा येऊन पण देवेंद्रसारखा येणार नाही. फौजदाराचा शिपाई होऊन येणार नाही. मी येईन तो येथे जो भगवा फडकतोय तो अधिक उंचावर नेण्यासाठी. मी येईन येथील गद्दाराला पाडलेला पाहण्यासाठी, तर तुमचा उत्साह हा शिखरावर गेलेला पाहण्यासाठी असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 26, 2023 09:43 AM
Latest Videos

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप

राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र

औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात

औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
