Ganpati Visarjan : गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी, कसा आहे पोलीस बंदोबस्त?
गेली दोन वर्ष या सार्वजनिक उत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे गणेश भक्तांचा घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. यंदा मात्र, निर्बंधमुक्त अशा वातावरणात गणरायाला निरोप दिला जात आहे. सायंकाळी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी होण्यास सुरवात झाली होती. तर पोलिस प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी या ठिकणी तैनात होते.
मुंबई : 10 दिवसांच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. (Mumbai) मुंबईसह उपगनरातील गणेश मंडळामध्ये कमालीचा उत्साह असून विविध उपक्रम राबवले जात आहेत विसर्जनाच्या अनुषंगाने (Girgaon Chaupati) गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी झाली आहे. तर मुंबईतील वेगवेगळ्या भागातून गणेश मूर्ती येथील चौपाटीवर दाखल झाल्या आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही दुर्घटना घडू नये म्हणून यंदा चोख (Mumbai Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेली दोन वर्ष या सार्वजनिक उत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे गणेश भक्तांचा घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते. यंदा मात्र, निर्बंधमुक्त अशा वातावरणात गणरायाला निरोप दिला जात आहे. सायंकाळी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची गर्दी होण्यास सुरवात झाली होती. तर पोलिस प्रशासनासह महापालिकेचे अधिकारी या ठिकणी तैनात होते.
Published on: Sep 09, 2022 07:08 PM
Latest Videos