गुलाबी थंडीमुळे Mumbaiमधील स्वेटर व्यावसायाला अच्छे दिन
मुंबई(Mumbai)त गेल्या काही दिवसांपासून थंडी(Cold)चा कडाका वाढलाय. त्यामुळे मुंबईच्या लोअर परेलच्या फूटपाथवर हंगामी विक्रेते आले आहेत. मुंबईकरही स्वेटर (Sweater) आणि इतर उबदार कपडे घेण्यासाठी या विक्रेत्यांकडे गर्दी करत आहेत.
मुंबई(Mumbai)त गेल्या काही दिवसांपासून थंडी(Cold)चा कडाका वाढलाय. त्यामुळे मुंबईच्या लोअर परेलच्या फूटपाथवर हंगामी विक्रेते आले आहेत. मुंबईकरही स्वेटर (Sweater) आणि इतर उबदार कपडे घेण्यासाठी या विक्रेत्यांकडे गर्दी करत आहेत. साधारणपणे तीन महिन्यांसाठी हे विक्रेते मुंबईत येत असतात. यंदा थंडी जास्त असल्यानं त्यांचा व्यवसायही चांगला चालत असल्याचं दिसतंय. मुंबईत फारशी थंडी पडत नसते. पण यंदा गुलाबी थंडी पडलीय. अशावेळी मुंबईकर गारठलेत. त्यामुळे कल्याण, घाटकोपर अशा ठिकाणांहून ग्राहक उबदार कपडे घेण्यासाठी या मार्केटमध्ये येत आहेत. दरम्यान गुलाबी थंडीचा आस्वाद घेत असल्याचंही मुंबईकर म्हणालेत. विक्रेत्यांनाही फायदा होत असल्याचं दिसतंय. कोविडमुळे जे नुकसान झालं, ते काही अंशी का होईना भरून निघेल अशी या विक्रेत्यांना आशा आहे.
Latest Videos