आताच्या मुख्यमंत्र्यांना हवाई सफर आवडत नाही, Shambhuraj Desai यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला
जुने मुख्यमंत्री आमचेच होते त्यावेळी मीही त्यांचा मंत्री मंडळात होतो. पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हवाई सफर आवडत नाही असा टोला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
जुने मुख्यमंत्री आमचेच होते त्यावेळी मीही त्यांचा मंत्री मंडळात होतो. पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हवाई सफर आवडत नाही असा टोला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात त्यांनी 19 हजार कोटी रुपये निधी निती आयोगाच्या माध्यमातून राज्याला त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे राज्यात एक लाख 82 हजार शासकीय व निमशासकीय पदे भरणे रिक्त आहेत. त्यापैकी 75 हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले. कराड येथे माध्यमाशी संवाद साधताना ते बोलत होते.