भुशी धरणापाठोपाठ लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर पर्यटकांची गर्दी ओव्हर फ्लो
अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. ज्यामुळे अशा ठिकाणी जावे की न जावे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र असे असतानाही पर्यटक मात्र काही प्रसिद्ध ठिकाणी जातच असतात. अशाच काही ठिकाणांपैकीच एक लोणावळा आहे.
लोणावळा; 24 जुलै 2023 | विकेंड म्हटलं की पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक मनमुराद आनंद लूटायला घराबाहेर पडतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. ज्यामुळे अशा ठिकाणी जावे की न जावे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र असे असतानाही पर्यटक मात्र काही प्रसिद्ध ठिकाणी जातच असतात. अशाच काही ठिकाणांपैकीच एक लोणावळा आहे. त्यामुळे विकेंडला लोणावळ्याकडे पर्यटकांची पावलं आपोआप वळतात. सध्या भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याने टायगर आणि लायन्स पॉईंट देखील पर्यटकांनी ओव्हर फ्लो झाला आहे. टायगर पॉईंट अक्षरशः धुक्यात हरवून गेलाय. तर थंडगार हवा, कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरला गेल्याची प्रचिती होते आहे. पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात गर्दी केल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोणावळा ते भुशी डॅमच्या मार्गावर सहा ते सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे देखील दिसत आहे. लोणावळ्यामधून भुशी धरण, टायगर, लायन्स पॉईंट कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा पोलिसांवर या वाहतूक कोंडीचा मोठा ताण येत असून बेशिस्त पर्यटकांमुळे अन्य पर्यटकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय