आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर दादा भुसे यांचा पलटवार; म्हणाले, “दुधाचे दात…”
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली. त्यांच्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिक, 24 जुलै 2023 | ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली. “मुख्यमंत्री जे घटनाबागह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, अलिबाबा अन् गद्दार आहेत, त्यांचं नेहमी लोकेशन बघा. प्रत्येक दोन दिवसांनी ते दिल्लीला जातात,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्या या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “राजकारणात टीका-टिपण्णी करताना आपले वय काय, याचे भान ठेवायला हवे. अजून काही जणांचे दुधाचे दातही पडलेले नाहीत. अजून खूप पुढे जायचे असल्याने आपण काय वागतो, कोणाबद्दल काय बोलतो, याचे भान ठेवायला हवे.”
Published on: Jul 24, 2023 09:23 AM
Latest Videos