‘बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणी अधिकार गाजवू शकत नाही’; शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

‘बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणी अधिकार गाजवू शकत नाही’; शिंदे गटाच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 11, 2023 | 1:19 PM

शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना त्यांनी, शिंदे गटाला शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांवरून टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी पलटवार केला होता.

धुळे : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे मेळाव्यात शिंदे गटावर प्रहार केला होता. शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना त्यांनी, शिंदे गटाला शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांवरून टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी पलटवार केला होता. याचदरम्यान शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे बंदरे व खनी कर्म मंत्री दादा भुसे यांनी देखील ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून ते राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे कोणी एक व्यक्ती किंवा कुटुंबापुरता ते मर्यादित नाहीत. किंवा त्यांचा विषय नाही. नक्कीच वारसा हक्काने ते कोणाची संपत्ती असू शकतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारस हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. संपूर्ण देशातील हिंदुत्व वाद्यांचा आहे. त्यामुळे कोणी त्याच्यावर अधिकार गाजवू शकत नाही अशा शब्दात भुसे यांनी ठाकरे यांना सुनावले आहे.

Published on: Jul 11, 2023 01:19 PM