वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही, मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅनर्सवर ठाकरे गटाची टीका

“वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅनर्सवर ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jun 19, 2023 | 4:09 PM

आज शिवसेनेचा 57वा वर्धापनदिन आहे. या दिनानिमित्त ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे.माजी आमदार दगडू सकपाळ यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून सडकून टीका केली आहे.

मुंबई : आज शिवसेनेचा 57वा वर्धापनदिन आहे. या दिनानिमित्त ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे. माजी आमदार दगडू सकपाळ यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून सडकून टीका केली आहे. वाघ बोलून कोणी वाघ होत नाही वाघाचं काळीज लागतं. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्यामुळे आम्ही काही वाईट बोलणार नाहीत.दुसऱ्यांच्या शिवसेनेला आम्ही मानत नाहीत, हा वर्धापनदिन आमचा आहे, असं दगडू सकपाळ म्हणाले.

Published on: Jun 19, 2023 04:07 PM