Dahi Handi 2022 : यंदा पोस्टरवरचे चेहरे बदलले, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे पोस्टरवर उल्लेख

Dahi Handi 2022 : यंदा पोस्टरवरचे चेहरे बदलले, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे पोस्टरवर उल्लेख

| Updated on: Aug 19, 2022 | 12:37 PM

टेंभी नाका येथील दहीहंडीला यावर्षी खास महत्व आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली दहीहंडीचं आयोजन या वर्षी देखील करण्यात आलंय . 

ठाणे : टेंभीपाडा नाका येथील दहीहंडीला (Dahi Handi 2022)  यावर्षी खास महत्व आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीनं धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली दहीहंडीचं आयोजन या वर्षी देखील करण्यात आलं आहे. मात्र, या वर्षी पोस्टरवरचे चेहरे बदलले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पोस्टरसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे पोस्टर आहेत. ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही,’ यासह बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह साजरा केला जातोय. विशेष म्हणजे बालगोपाल देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. आज दिवसभर हा उत्साह चालणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह अधिक दिसतो आहे.

Published on: Aug 19, 2022 12:36 PM