ठाण्यात गोविंदांचा ढाक्कुमाक्कुम… दहीहंड्या फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस, बघा रोमहर्षक थरार

| Updated on: Aug 27, 2024 | 3:20 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत.

Follow us on

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखोंचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्या फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगत असल्याचे सकाळपासून पाहायला मिळत आहे. प्रताप सरनाईक यांनी यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदाचे आयोजन केलं आहे. या ठिकाणी विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून टेंभी नाका दहीहंडी प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानाकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. तसेच अनेक बॉलिवूड कलाकार, मराठी सेलिब्रेटी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यासह ठाण्यात राजन विचारे आयोजित दहीहंडीचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच कॅसल मील चौकात भाजप नेते कृष्णा पाटील यांच्याकडून गोकुळ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण 55 लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.