ओहहह…. रेकॉर्ड होता होता राहिला, 10 व्या थरावर सलामी अन् पत्त्यासारखे गोविंदा कोसळले, ‘जय जवान’चा विक्रम थोडक्यात चुकला

| Updated on: Aug 27, 2024 | 5:33 PM

ठाण्यात दरवर्षी मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्याचं आयोजन केलं जातं. जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षच्या दहीहंडीमुळे ठाण्यात या उत्सवाला ग्लॅमर मिळालं. पण गेल्या काही वर्षांपासून आव्हाड दहीहंडी साजरा करत नाहीत. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं. याच वेळी जय जवानचा रेकॉर्ड होता होता राहिला.

Follow us on

आज मुंबई, ठाण्यात सकाळपासूनच ढाकुमाकुम, ढाकुमाकुम असं गोविंदाकडून ऐकायला मिळत आहेत. लाखोंचे बक्षीस पटकावण्यासाठी आणि आपल्याच पथकाच्या नावे रेकॉर्ड व्हावा यासाठी मुंबई, ठाण्यात मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगताना दिसतेय. तर मानवी मनोरे रचताना ‘बोल बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत गोविंदा आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवताना दिसताय. मुंबईतील सर्वाधिक उंचीचे थर रचून मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या फोडण्याचा रेकॉर्ड हा जय जवान गोविंदा पथकाच्या नावे आहे. जय जवान गोविंदा पथकाची उपनगरचा राजा अशी ओळख आहे. जय जवान गोविंदा पथक दरवर्षी 9 थर रचून हंड्या फोडत असते. मात्र यंदाच्या वर्षी जय जवान गोविंदा पथक स्वतःचाचं रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झालंय. जय जवान गोविंदा पथकाचा 9 थरांचा रेकॉर्ड असून मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली आहे. तर ठाण्यात संस्कृती प्रतिष्ठानची हंडी फोडण्यासाठी मुसळधार पावसात जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थर लावण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू असताना गोविंदांचा थर हा पत्त्यांसारखा कोसळ्याचे पाहायला मिळाले आणि ‘जय जवान‘ पथकाचा विक्रम थोडक्यात चुकल्याने पथकातील गोविंदाना हुरहुर लागली.