Gulabrao Patil On CM Ekanth Shinde | 50 थर फोडले म्हणूनच राज्यात सत्तांतरण झाले - tv9

Gulabrao Patil On CM Ekanth Shinde | 50 थर फोडले म्हणूनच राज्यात सत्तांतरण झाले – tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 11:24 AM

मुख्यमंत्री शिंदे यांनी जे काय म्हटलेलं आहे, त्यात सत्य आहे. त्यावेळी 50 थर लावले म्हणूनच आज महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

काल राज्यात दहीहंडीचा उत्साह सगळीकडे पहायला मिळाला. राज्यात एकीकडे गोविंदा दहीहंडी फोडत असतानाच राजकारण्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जोरदार बॅटींग केली. त्यांनी आपण दिड महिन्यापूर्वीच 50 थर लावत दहीहंडी साजरी केल्याचे म्हटले होते. त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ते यावेळी ते म्हणाले, निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे यांनी जे काय म्हटलेलं आहे, त्यात सत्य आहे. त्यावेळी 50 थर लावले म्हणूनच आज महाराष्ट्रात सत्तांतर झालं आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे येत आहेत तर येऊन दे. हा त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहेत.

 

Published on: Aug 20, 2022 11:24 AM