Devendra Fadnavis | ‘आता कोणावर बंधन नाही’फडणवीसांच वक्तव्य- tv9
त्यावेळी फडणवीस यांनी मागिल महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधताना आपलं सरकार आल्यानंतर कसं खुल खुल झालं, असं ते म्हणाले.
राज्याच्या कानाकोपऱ्यात आज दहीहंडी जल्लोषात केली जात आहे. याचा उत्साह बोरवलीत देखील पहायला मिळाला. येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानचे दहीहंडीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावेळी फडणवीस यांनी मागिल महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधताना आपलं सरकार आल्यानंतर कसं खुल खुल झालं, असं ते म्हणाले. तसेच दहीहंडी जोरात, गणेश उत्सव जोरात आणि नवरात्री देखील जोरात होणार असल्याचे सांगताना आता कोणावरही बंधन नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केलेला घोषणेचा पुनरुचार करताना सांगितले की, गोविंदा हा फक्त गोविंदा राहणार नाही तर ते आता खेळाडू आहे. दहीहंडी उत्सवात कोणताही अपघात होऊ नये मात्र दुर्दैवाने काय झालं तर सरकार ही तुमच्या पाठीशी आहे आणि भाजपही पाठीशी असल्याचे फडणवीस म्हणाले.