Aaditya Thackeray | आज राजकारण करण्याचा दिवस नाही- आदित्य ठाकरे- tv9
त्यांना दीड महिन्यापूर्वी 50 थर लावले आणि हंडी फोडली या फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, ते म्हणाले, त्यावेळी थरकाप कोणाचा झाला? कोणाचा थरकाप उडाला हे जनतेला माहित आहे.
राज्यातील मोठमोठ शहरांसह गावपातळीवरही दहीहंडी उत्साहात केली जात आहे. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी कोणीही राजकारण करू नका. राजकारणाच्या बाता करू नका. यावर आपल्याला बोलायला हाऊस आहे. सभा आहेत, असा टोला शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. तसेच त्यांना दीड महिन्यापूर्वी 50 थर लावले आणि हंडी फोडली या फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, ते म्हणाले, त्यावेळी थरकाप कोणाचा झाला? कोणाचा थरकाप उडाला हे जनतेला माहित आहे. सोडा किमान आजच्या दिवशी तरी राजकारण नको. तसेच सुरू असणाऱ्या पोस्टरबाजीवर ही बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे दुर्दैवी आहे. पोस्टरबाजी करून टोमणे, टिपा टिपणी करणे हा बालिशपणा आहे. आणि अशा बालिशपणामुळे मरण कार्यकर्त्यांचं होतं. त्यांचा विचार करा.
,
Published on: Aug 19, 2022 06:14 PM
Latest Videos