गौतमीच्या एका झलकसाठी पठ्ठ्यानं डेपोलाच पत्र दिलं; म्हणाला…तिला पहायचयं…
तिचा एखाद्या गावात कार्यक्रम असला की राजकीय पुढाऱ्याप्रमाणे पोलिस बोलवावे लागत्यात. नाहीतर मग राडाच. कोणता राजकीय कार्यक्रम असो, बर्थ डे असो किंवा उद्घाटन गौतमी पाटीलला खास आमंत्रण दिलं जातंय.
सांगली : नृत्यांगणा गौतमी पाटील फक्त नावचं पुरेसं आहे. गौतमी पाटलाच्या लावणीची अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ आहे. ‘जिथे गौतमी पाटलाचा शो, तिथे शो हाऊसफुल’असंच समीकरण सध्या राज्यात पहायला मिळत आहे. तिचा एखाद्या गावात कार्यक्रम असला की राजकीय पुढाऱ्याप्रमाणे पोलिस बोलवावे लागत्यात. नाहीतर मग राडाच. कोणता राजकीय कार्यक्रम असो, बर्थ डे असो किंवा उद्घाटन गौतमी पाटीलला खास आमंत्रण दिलं जातंय. मध्यंतरी तिला एका बैलासाठी बोलवलं गेलं आणि ती नाचली की राव. मग कोण का खुश होणार नाही. यात महिलावर्गही काय मागं नाही. तिच्या कार्यक्रमाचा जलवा पहायला पुरूषांबरोबर महिलांची गर्दीही अफाट असते. आता त्यात मग कोणीही असू शकतो. आता अशाच एका जबराट फॅनची चर्चा राज्यभर होत आहे. पठ्ठ्या एसटी कामगार असून फक्त गौतमीला पाहण्यासाठी चक्क कामावर दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. सध्या त्याचे हेच पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तासगाव आगारात तो काम करत असून त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गौतमीला एकदा तरी पाहता यावं म्हणून पठ्ठ्यानं एसटी आगारात दोन दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला. त्याच्यात गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवस रजा मिळावी असा अर्ज समोर आला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.