Gautami Patil : त्यांना माझ्या समोर उभं कराच!; गौतमी पाटील हिनं थेट रघुवीर खेडकरानांच केलं आवाहन
बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाही आणि दुसरीकडे चार मुली अन् पाचवी गौतमी पाटील असलेल्या कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आहे. अनेक तरुणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे. तर सध्या तिला तिचा क्रायक्रम आणि तिचं नृत्य यावरुन टीकेचा सामनाही करावा लागला आहे. गौतमीच्या मानधनावरून इंदोरीकर महाराजांनीही काही दिवसांपूर्वी टीका केली होती. हा वाद संपतो ना संपतो तोच तिच्यावर ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) यांनी टीका केली होती. त्यांनी बऱ्याच गावात 100 कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक दोन लाख रुपये द्यायला नकार देतात, तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला पाच-पाच लाख रुपये देतात. यावरुनच लोककलेची ‘गौतमी पाटील’ करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, असं वक्तव्य खेडकर यांनी केलं होतं. त्यावर आता गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीने, खेडकर यांनी आव्हान करत जे कोणी मला, माझ्या कार्यक्रमाला 5 लाख देतात त्यांना माझ्या समोर आणाच असं म्हटलं आहे. तर माझी इतकी फी नाही आणि राहिला प्रश्न लावणीचा तर मी लावणी करत नाही. माझा डिजे नृत्याचा कार्यक्रम असतो असेही गौतमीने म्हटलं आहे.