अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे आदेश

अनिल परब यांना हायकोर्टाचा दिलासा, कठोर कारवाई न करण्याचे आदेश

| Updated on: Mar 20, 2023 | 2:54 PM

अनिल परब यांना न्यायालयाने दिसाला देत ईडी 23 मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब यांना सध्यातरी दिलासा मिळाला आहे

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लाँडरींग प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सतत आवाज अठवला होता. त्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याचदरमायान त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली. त्यामुळे अनिल परब यांनी उच्च नायालयात धाव घेतली होती. त्यावनर आज सोमवारी सुनावणी पार पडली. यावेळी परब यांना न्यायालयाने दिसाला देत ईडी 23 मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब यांना सध्यातरी दिलासा मिळाला आहे. परब यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने अनिल परब यांना 20 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं.

Published on: Mar 20, 2023 02:54 PM