‘बच्चू कडू नाराज नसून ते लवकरच…’; भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य
गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तारावरून ते सरकारवर नाराज होते. तर त्यांनी यावरून वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आताही त्यांनी मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.’ असं सूचक वक्तव्य केलं आहे.
मुंबई : जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तारावरून ते सरकारवर नाराज होते. तर त्यांनी यावरून वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आताही त्यांनी मी नाराज होत नाही.. आणि झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही.’ असं सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ते भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाम नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते भाजपचे प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मंत्रीपदावरून आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत जी नाराजी व्यक्त केली होती त्यावरून हे वक्तव्य केलं आहे. दरेकर यांनी बच्चू कडू नाराज नसून ते लवकरच खुश दिसतील अस सूचक वक्तव्य केलं आहे.